आईची थोरवी मराठी निबंध​ | Aaichi Thoravi Marathi Nibandh

 आईची थोरवी मराठी निबंध​ | Aaichi Thoravi Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आईची थोरवी मराठी निबंध बघणार आहोत. आई! हा शब्दच किती पवित्र आहे. या शब्दात पर्वताची उत्तुंगता आहे, आकाशाची विशालता आहे व सागराची अथांगता आहे. आईची मोठेपण वर्णन करायला खरे तर शब्दही अपुरे पडतात. 


तिच आपली पहिली गुरु असते. आपल्याला चालायला, बोलायला शिकवते ती आईचं व आपले संगोपन करते ती आईचं. मूल पहिला शब्द उच्चारते तो 'आई' हाच. म्हणूनच म्हणतात.


'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी'


आई व मुलाचे नाते अतूट असते. मुलावर चांगले संस्कार करण्याचे काम तिच करते. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, जगाचे रितीरिवाज तिच तर समजावून सांगते. ती आपलें प्रेम देताना कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. मुलाला काही लागले, दुखले, आजारी पडले तर आई त्याला जवळ घेते. 


आपल मूल मोठे व्हावे, यशस्वी व्हावे हीच तिची धडपड असते. त्यासाठी कितीही कष्ट करण्याची तिची तयारी असते. आपल्या आयुयात आईचे विशिष्ट स्थान असते. प्रत्येक मूल यशस्वी होण्यामागे आईचा मोठा वाटा असतो.


जिजाबाईंनीच शिवाजीच्या मनात परकीयांविरुद्ध आवाज उठविण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या जडण-घडणीत जिजाबाईंचा मोलाचा सहभाग होता. महात्मा गांधींनी आईच्या शिवणूकीतुनच सत्य व अहिंसेचे व्रत घेतले. गांधीजी म्हणतात, 'एक माता हजारो शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.


' श्यामच्या आईची गोष्ट कोण बरे विसरु शकेल? आईचे उपकार आपण सात जन्मात फेडू शकत नाही. आईचे मन, आईची थोरवी, तिची माया शब्दात मांडता येणे अशक्य आहे. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद