भूकंपग्रस्ताचे आत्मवृत्त मराठी निबंध | bhukampgrastache atmavruth nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. नमस्कार! माझे नाव नवीन पटेल. मी गुजरातमधील भूज गावांचा रहिवासी. मी, माझे आईवडिल, आजी-आजोबा व भावंडा समवेत रहात होतो. पण आता त्यांच्यापैकी कोणीही हयात नाहीत. २६ जानेवारी, २००० सालच्या भूकंपात फक्त मी व माझी लहान बहीण वाचलो. बाकी सर्वांना काळाने ओढून नेले.
मला अजूनही आठवतो तो काळा दिवस. आम्ही भावंड शाळेत झेंडावंदनला जाण्याच्या गडबडीत होतो. वडील शेतावर निघाले होतो. आजोबा-आजी व आई आपापल्या कामात मग्न होते. अचानक धडाम्धुम असे आवाज येऊ लागले. मला प्रथम चक्कर आल्याचा भास झाला.
पण हळूहळू कपाट, खुर्च्या, सगळ घर जोरात हलू लागले. स्वयंपाकघरातील भांडी कोसळली. सगळीकडून किंचाळण्याचा आवाज येऊ लागला, मला शाळेत शिकवलेला एक धडा आठवला, की भूकंप झाल्यास बाहेर मोकळया मैदानात, रस्त्यावर जावे. जवळच उभ्या असलेल्या माझ्या लहान बहीणीला मी उचलून घेतले व सर्वांना घराबाहेर निघा असे सांगू लागलो.
बहिणीला घेऊन मी घराच्या बाहेर पडतो न पडतो तोच संपूर्ण घरच खाली कोसळले. काही कळायच्या आतच आई-बाबा, आजी-आजोबा व इतर भावंड दगड, मातीच्या ढिगांराखाली गाडली गेली.
काही वेळाने शुद्ध आली तेव्हा मी एका घराच्या ओट्यावर होतो. माझी बहीणही माझ्या सोबत होती. आजूबाजूला सर्वत्र वेदना, किंचाळ्या, रडणे, कण्हणे यांचे आवाज उठत होते. जीव वाचला म्हणून आनंद मानावा की सर्व काही डोळ्यादेखत नाहीसे झाले म्हणून दुःख करावे?
आमच्या गावातील सर्वच इमारती पडल्या होत्या. माणसे ढिगारांखाली अडकली होती. लवकरच अग्निशमन दलाचे व इतर सरकारी लोक मदतीसाठी धावून आले. तंबू-राहुट्या उभारल्या गेल्या. जखमींवर उपचार सुरु झाले. माझ्यासारखे जे लोक बरे होते असे लोक इतरांना मदत करायला, पाणी द्यायला, जखमा साफ करायला धावले.
दुसऱ्या दिवशीपासून मदतीचा ओघ सुरू झाला. समाजसेवी संस्था तसेच अनेक दयाळू लोक गावाकडे आले. सोबत आणलेले अन्न, औषधे, कपडे त्यांनी लोकांना वाटले. जखमींना मदत केली. घाबरलेल्या मुलांना धीर दिला. आम्हा भूकंपग्रस्तांना हर प्रकारे मदत केली.
देवाने आमचे सर्वस्व हिरावले पण त्याचबरोबर मानवतेचे दर्शनही घडविले. सरकारने आम्हा भूकंपग्रस्तांना परत घरे बांधून दिली. मी व माझी बहिण आत अशाच एका छोट्या घरात रहातो. सरकारी मदत देताना या अधिकाऱ्यांच्या स्वार्थी वृत्तीचीही झलक पहावयास मिळाली.
परंतु असे बरे-वाईट अनुभव येतातच, नाही का? या साऱ्या संकटानी मला दोन फायदे झाले प्रसंगाला तोंड कसे द्यायचे हे शिकविले, मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद