डॉ. होमी भाभा निबंध मराठी | Dr Homi Bhabha Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ. होमी भाभा मराठी निबंध बघणार आहोत. भारताला अणूयुगात घेऊन जाणारा थोर शास्त्रज्ञ म्हणून डॉ. होमी भाभांना ओळखले जाते. त्यांना 'भारतीय आण्विक तंत्रज्ञानाचे जनक' असेही म्हंटले जाते. डॉ. भाभा यांचा जन्म एका सुखवस्तु पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल म्हैसूर संस्थानात शिक्षण निरिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु डॉ. भाभांचे शिक्षण मुंबई येथे झाले.
वयाच्या अठराव्या वर्षी, सन १९२७ मध्ये ते उच्च शिक्षाणसाठी इंग्लंड येथे गेले. तेथील केंब्रीज विद्यापिठात इंजीनियरिंगसाठी त्यांनी प्रवेश घेतला. ते एक अतिशय हुशार विद्यार्थी होते व विद्यार्थी जीवनातच त्यांनी अनेक मान-मरातब मिळविले.
याच काळात त्यांनी इलेक्ट्रिसिटी, चुंबकत्व, क्वांटम थिअरी व कॉस्मिक किरण या क्षेत्रांमध्ये संशोधन कार्य केले सन १९३५ मध्ये त्यांना केंब्रीज विद्यापिठाची डॉक्टरेट मिळाली. परदेशात असतांना भाभांनी अणूविज्ञानातील फिशन (fission) प्रक्रियेबद्दल अभ्यास केला.
१९३७ मध्ये सर. सी. व्ही. रामन यांच्या हाताखाली रुजू झाले. (बेंगलोर येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथे प्राध्यापक म्हणून). पुढे आण्विक क्षेत्रातील त्यांचा दांडगा अभ्यास जाणून नेहरुंनी त्यांच्यावर अणूविज्ञानात भारताला स्वयंपूर्ण करण्याची जबाबदारी सोपविली ऍटोमिक एनर्जी कमिशनचे पहिले चेअरमन म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
भारतातील पहिले अणू संशोधन केंद्र तारापूर, मुंबई येथे सुरु करण्याचे संपूर्ण श्रेय डॉ. भाभा यांच्याकडे जाते. आता या केंद्रास डॉ. भाभा यांचे नाव देण्यात आले आहे. भारतातील पहिली अणू-भट्टी 'अप्सरा' कार्यान्वित करण्याचे श्रेयही त्यांचेच. १९४१ मध्ये मुंबई येथे त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली.
अणूउर्जेत विद्युत उर्जेत रुपांतरित होऊ शकण्याची क्षमता आहे हे सर्वप्रथम त्यांनीच ओळखले व त्या दृष्टिने पाऊले उचलली. डॉ. भाभा हे एक अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ, होते व आपल्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले होते. ते अतिशय योजनाबद्धतेने काम करीत असत.
त्यांची काटेकोर अंमलबजावणी करीत. याव्यतिरिक्त कला व संगीत यातही त्यांना रस होता. संगीताची त्यांना उत्तम जाण होती. उच्च कोटीचे शास्त्रज्ञ म्हणून त्यांना अनेक पुरस्कार व गौरवांनी गौरविले गेले. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवली. १९४२ मध्ये त्यांना ' अडॅम्स' पुरस्कार मिळाला.
१९५१ मध्ये ते भारतीय शास्त्रीय कॉन्फरन्सचे अध्यक्ष बनले. १९५५ मध्ये आण्विक शक्तीचे शांततामय कार्यासाठी उपयोग या विषयावर जिनेव्हा येथे भरलेल्या (संयुक्त राष्ट्रसंघातर्फे) आंतरराष्ट्रीय परिषदेचे चेअरमेन म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. भारत सरकारने १९५४ मध्ये त्यांना पद्मभूषण हा सन्मान दिला.
अशा या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू एका विमान अपघातात झाला. युरोपच्या दौऱ्यावर असताना त्यांचे विमान माउंट ब्लँक येथे कोसळले. भारताच्या अणू कार्यक्रमांचे त्यांच्या या मृत्युमुळे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद