भारतीय शेतकरी निबंध मराठी | Farmer Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारतीय शेतकरी मराठी निबंध बघणार आहोत. भारत हा खेड्यांचा देश आहे. भारताचा आत्मा खेड्यात, खेड्यातील शेतकऱ्यांत आहे. भारत हा कृषि प्रधान देश आहे. येथील ७०% लोकसंख्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी आपल्यासाठी अन्न, भाजीपाला, फळे, इ० पिकवितो पण स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाल्यावरही तो गरीब, अशिक्षित, निर्बल आहे.
त्याला खूप मेहनत करावी लागते. त्याचे सारे कुटुंब रात्रंदिवस शेतात राबत असते. कसाबसा त्याचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अजूनही तो जुन्याच, परंपरागत अवजारांनी शेतीची कामे करतो.
मान्सूनच्या पावसावर भारतीय शेतकऱ्याला अबलंबून राहावे लागते. पाऊस पडला नाही तर पिके वाळून जातात. दुष्काळ पडतो. उपाशी मरण्याची पाळी येते. इतकी मेहनत करूनही तो गरीब व परतंत्रच आहे. त्याचे उत्पन्न कमी असल्यामुळे तो चांगली बियाणे, खत, अवजारे, बैल खरेदी करू शकत नाही.
तो अशिक्षित असल्यामुळे अंधविश्वासू व वाईट रूढी परंपरांचे पालन करणारा आहे. त्याची मुले शिक्षण देऊ शकत नाही. गांवात शाळा नसते, असली तर खूप दूर असते. या खेरीज शेतकऱ्याला आपल्या मुलांना नाईलाजाने शेती कामासाठी, गुरे चारण्यासाठी पाठवावेच लागते.
शासनाने भारतीय शेतकऱ्याच्या मदतीसाठी काही चांगली पावले उचलली आहेत. त्याला कमी व्याजावर कर्ज देण्याची व्यवस्था आहे. त्यातून तो बियाणे, खत इत्यादी घेऊ शकतो. परंतु हे पुरेसे नाही. बरेचदा शेतकऱ्यापर्यंत मदत जातच नाही मधलेच लोक पैसे खातात.
अशिक्षित असल्यामुळे शेतकरी आपल्या अधिकाराप्रती जागरूक नाही. दुसरे लोक सहजपणे त्याच्या अधिकारावर आक्रमण करतात. म्हणून त्याला शिक्षित करणे फार आवश्यक आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण अनिवार्य आहे व ते मोफत असावे. प्रत्येक गावात, गावाच्या जवळ शाळा उघडली गेली पाहिजे.
शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज सहज मिळाले पाहिजे. वर्षातील बराच काळ शेतकरी रिकामा असतो. या काळाचा उपयोग त्याचे शिक्षण आणि शेती संबंधी ज्ञान देण्यासाठी केला जायला हवा.
जो पर्यंत भारतीय शेतकरी निर्धन आणि अशिक्षित आहे तो पर्यंत देश प्रगति करू शकणार नाही. हर प्रकारे शेतकऱ्याला मदत करून त्याला स्वावलंबी आणि शिक्षित बनवले गेले पाहिजे. तो रिकामा बसणार नाही आणि त्याचे शेत रिकामे राहणार नाही अशी व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी शासनाने मोठया प्रमाणावर सिंचन व्यवस्था केली पाहिजे.
बहुताश भारतीय शेतकरी शेतमजूर आहेत. किंवा त्यांच्या जवळ फारच थोडी जमीन आहे. ही जमीन अनुत्पादक आहे. सिंचन साधनांचा अभाव असतो. त्यामुळे तो त्यात काही पिकवू शकत नाही आणि जे पिकवतो त्याची योग्य किंमत त्याला मिळत नाही. कित्येकदा त्याचा माल विकत नाही म्हणून खराब होतो.
आपले स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी आपणास "जय जवान जय किसान" ही घोषणा दिली होती. या वरून भारतीय शेतकरी किती महत्वाचा आहे हे कळते. परंतु आजही भारतीय शेतकऱ्याची स्थिती दयनीयच आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद