माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | My Favourite Teacher Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आवडते शिक्षक मराठी निबंध बघणार आहोत. आमच्या शाळेतील सर्वच शिक्षक वर्ग चांगला व कार्यक्षम आहे. सर्वच शिक्षकांबद्दल आम्हाला आदर वाटतो. परंतु माझे सर्वात आवडीचे शिक्षक आहेत श्री. अमीत पाटिल. माझ्या विद्यार्थीजीवनात सर्वात जास्त प्रभाव त्यांचाच आहे.
खरे म्हणजे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे ते आवडते शिक्षक आहेत. गेल्या दोन वर्षापासून ते आमचे वर्गशिक्षक आहेत. सरांचे व्यक्तिमत्व कोणावरही छाप पाडेल असेच आहे. ते नेहमी साधेच परंतु स्वच्छ पोशाख करतात. ते स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत.
आम्ही त्यांना कधीही दमलेले, चिडलेले असे पाहिले नाही. ते नेहमी हसतमुख असतात व विद्यार्थ्यांनाही आनंदी रहायला सांगतात. ते स्वतः सतत कामात असतात. मी त्यांना कधीही नुसतेच बसलेले किंवा अनावश्यक गप्पा मारतांना पाहिलेले नाही.
त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्याचे, मेहनत करण्याची स्फूर्ती मिळते. त्यांची स्वत:ची शैक्षणिक कारकिर्दही उत्तम आहे. त्यांनी इंग्रजी विषयात M.A. केले आहे. आपल्या विषयांची त्यांना उत्तम जाण आहे. त्यांचे व्याख्यान ऐकणे ही खूपच आनंदाची गोष्ट असते.
कठिण विषयही सोपा करुन सांगण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या विषयात शोचे विद्यार्थी नेहमीच चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात. श्री. पाटिल सर चांगले खेळाडूही आहेत. ते फुटबॉल चांगले खेळतात. शाळेतील क्रिडासाहित्याचे ते इन-चार्ज आहेत.
विद्यार्थ्यांना खेळांचे चांगले साहित्य पुरविणे तसेच त्याची काळजी घेणे याकडे त्यांचे लक्ष असते. मैदानावर ते असले की मुले धमाल करतात. शाळेतील इतर शिक्षकांचेही ते आवडते व्यक्तिमत्व आहे. कारण ते कोणाचाही हेवा करीत नाहीत किंवा कोणाबद्दल वाईटही बोलत नाहीत.
त्यामुळेच ते मुख्याध्यापकांचा उजवा हात आहेत. प्रत्येक बाबतीत मुख्याध्यापक त्यांचा सल्ला घेतात. शाळेच्या सर्वच कार्यक्रमात ते उत्साहाने भाग घेतात. म्हणूनच त्यांना शाळेतील आदर्श शिक्षक मानले जाते. या पदवीचा ते पुरेपुर मान ठेवतात. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद